स्वस्तात गोव्याची सफर करा आणि धमाल मजा लुटा
गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय टुरिस्ट डेस्टिनेशनपैकी एक आहे. समुद्रकिनारे (Beaches), नाईटलाईफ (Nightlife) आणि सुंदर निसर्ग (Nature) यामुळे प्रत्येक प्रवाशाचे हे ड्रीम डेस्टिनेशन आहे. पण, अनेकांना वाटते की गोवा ट्रिप महागडी असेल. जर योग्य प्लॅनिंग (Planning) केले तर गोवाला कमी खर्चातही फिरता येऊ शकते. या ब्लॉगमध्ये तुम्हाला बजेटमध्ये गोवा ट्रिप कशी करायची याच्या काही टिप्स मिळतील.

सुंदर समुद्रकिनारे (Beaches)
गोव्यामध्ये 35 पेक्षा जास्त सुंदर समुद्रकिनारे आहेत. काही लोकप्रिय किनारे:
- बागा बीच – नाईटलाइफ आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध
- कांदोळीम बीच – शांत आणि स्वच्छ
- अंजुना बीच – हिप्पी कल्चर आणि फ्ली मार्केटसाठी ओळखला जातो
- पालोलेम बीच – निसर्गरम्य आणि रिलॅक्सिंग
पाचगणी: पाच पर्वतांच्या कुशीत दडलेलं रहस्य बघण्यासाठी येथे क्लिक करा.

गोव्याला कसे पोहचाल ? how to rich in goa ?
१. स्वस्त ट्रान्सपोर्ट
- ट्रेनने प्रवास (Travel by Train): गोव्याला जाण्यासाठी ट्रेन हा स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि दिल्ली येथून अनेक स्वस्त रेल्वे उपलब्ध आहेत.
- बसने प्रवास (Travel by Bus): अनेक खाजगी आणि सरकारी बसेस देखील स्वस्त पर्याय आहेत. खास करून, रेडबस (RedBus) किंवा इतर ट्रॅव्हल वेबसाइट्सवर डिस्काउंट मिळू शकतो.
- बजेटमध्ये स्थानिक प्रवास (Local Budget Travel): गोव्यात स्कूटी (Scooty) भाड्याने घेणे हा सर्वोत्तम आणि स्वस्त पर्याय आहे. दररोज साधारणतः 300-400 रुपये भाडे लागू शकते. पब्लिक बसेस (Public Buses) देखील स्वस्त आणि सोयीस्कर आहेत.
२. बजेटमध्ये राहण्याची ठिकाणे (Budget Accommodation)
- गोव्यात 5-स्टार हॉटेल्सऐवजी होस्टेल्स (Hostels), होमस्टे (Homestays) आणि गेस्टहाऊसेस (Guesthouses) स्वस्त पर्याय आहेत.
- हॉस्टेल्स: झोस्टेल (Zostel), मॅड मंकी (Mad Monkey), द व्हेफरर्स होस्टेल (The Wanderers Hostel) यांसारखी बजेट-फ्रेंडली ठिकाणे आहेत.
- बजेट हॉटेल्स: ओयो रूम्स (OYO Rooms) आणि एअरबीएनबी (Airbnb) वर देखील स्वस्त आणि आरामदायक पर्याय मिळू शकतात.
३. परवडणारे आणि चविष्ट स्थानिक जेवण (Affordable Local Food)
- लोकल फूड स्टॉल्स आणि कॅफे (Local Food Stalls & Cafes): गोव्यातील बीच शॅक्स (Beach Shacks) आणि स्मॉल कॅफेजमध्ये स्वस्तात आणि चविष्ट जेवण मिळते.
- फिश ठाळी (Fish Thali): स्थानिक गोअन फिश ठाळी ही चवदार आणि बजेट-फ्रेंडली असते.
- व्हेज पर्याय (Vegetarian Options): फूड ट्रक्स (Food Trucks) आणि स्ट्रीट फूडमध्ये स्वस्त आणि रुचकर पर्याय मिळू शकतात.
४. फ्री किंवा कमी खर्चात फिरण्यासारखी ठिकाणे (Free or Budget-Friendly Places to Visit)
- समुद्रकिनारे (Beaches): बागा (Baga), अंजुना (Anjuna), पालोलेम (Palolem) आणि मिरामार (Miramar) हे किनारे मोफत आहेत.
- फोर्ट्स आणि चर्च (Forts & Churches): अगोडा फोर्ट (Aguada Fort), चापोरा फोर्ट (Chapora Fort), बेसिलिका ऑफ बॉम जीझस (Basilica of Bom Jesus) यांसारखी ठिकाणे विनामूल्य आहेत.
- वॉटरस्पोर्ट्स (Watersports): जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर वॉटरस्पोर्ट्स पॅकेजेस स्वस्तात मिळू शकतात.
- निसर्गसंपन्न ठिकाणे (Nature Attractions): दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) आणि साळीम अली पक्षी अभयारण्य (Salim Ali Bird Sanctuary) यासारखी ठिकाणे कमी खर्चात पाहता येतात.
५. ट्रिपसाठी बेस्ट सीझन (Best Season for the Trip)
- ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. मात्र, ऑफ-सीझन (Off-Season) (जून ते सप्टेंबर) मध्ये हॉटेल्स आणि अॅक्टिव्हिटीज स्वस्तात मिळू शकतात.

वॉटर स्पोर्ट्स (Water Sports) 

- स्कूबा डायव्हिंग, जेट स्की, बनाना राईड, पैरासेलिंग यांसारखे अनेक वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांना आकर्षित करतात.
- बागा, कॅलंगुट, दोना पावला आणि अंजुना हे वॉटर स्पोर्ट्ससाठी सर्वोत्तम किनारे आहेत.
GOA Itinerary and Budget | Goa Itinerary | Goa Trip Budget click now