माय मराठी नेक्स्ट

मुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा पार पडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  नागपूर येथे आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, विभागाचे सचिव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री यांनी आदिवासी समाजाच्या इतिहासाचा गौरव करत, “हा समाज एकेकाळी राज्यकर्ता समाज होता आणि आजही या समाजातील मुलामुलींमध्ये मुख्य प्रवाहाला व्यापण्याची शक्ती आहे,” असे सांगितले. त्यांनी या समाजातील विद्यार्थी आणि खेळाडुंना कला, खेळ, व अभ्यासातील कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा उपयोग करून योग्य प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले.

आदिवासी समाजातून भविष्यात देशाचे नाव उंचावणारे खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री यांनी आजच्या स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडुंचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

WhatsApp
Facebook
Twitter
Email
Scroll to Top